Thursday, July 29, 2010

खुना चे Brands

बदल जिवनाचे नाव दुसरे, मरण भावंड धाकले /
जन्म असती लादलेले, म्रुत्यु मस्तकी मारलेले//

अधांतरी तसेच लोंबते जिवनचक्र येरझारलेले /
अभिमान दुर्गंधी भारलेले, भ्रामक भिती पिंजलेले //

जगू न देतो माणसा माणूस माणसा सारखे /
खुनाला सुद्धा नांव देतो;विसरून मसणा सर्व सारखे //

"आपलाच" करी खातमा ते Honor Killing जाणती /
"दुसरयाचा" पाडला मुडदा तर Communal Killing बोलती //

अंकुरली वारी त्याच युगाची नवी लेबले लेऊनी /
संजीवन समाधी अथवा सदेह वैकुंठ शेंदूर जुने टाकूनी //

संदीप गोडबोले

२९ जुलै २०१०

To write comments : Kindly Click "टिप्पणी" . To send the Article to other friends : Click Icon of Envelop with arrow on RHS of "टिप्पणी"

No comments: