Sunday, December 23, 2012

मधमाश्यांचे राष्ट्रगान

This poem was written on 2nd of Jan 2009. I am uploading it and keeping it on the Top of the Blog . All new posts shall be posted below this .

मारता कुणी जरी काडी खडा लहानाहून लहान
तुटून पडती त्यावर मधमाश्या घोंघावत राष्ट्र्गान//

मरमर करते अथांग गर्दी लोकल मध्ये चढण्या उतरण्याची
गोळीबार होताच पळते सैरावैरा घाबरट सश्या सारखी //

नि:शस्त्र मावळे धावून गेले चिलखतही नव्ह्ते सोबतीला
हौतात्म्याचा बाजार मग मांडला मेणबत्त्या अन म्य़ाराथोनचा //

मस्तवाल राजकारणी,गाफील गुप्तचर राज्य करती गांडुळ जनते वर
अळ्या,झुरळे दिवसाउजेडी बघा जंतही झळकती च्यानेलच्यानेल वर//

हैवान १० व बौम्ब १००, हातगोळे १०००,गोळ्या १०००० फक्त जेंव्हा होत्या
पायात शेपट्या एक करॊड महानगराच्या सगळ्या टी.व्ही.समोर तेंव्हा होत्या//

धावुन नि:शस्त्र लोंढा जरी कोसळता कसाब कंपनी वरती
जीव नसते गेले इतके अन बचत देखील वेळेची होती //

तत्क्षणीच आग्यामोहोळासम तुटून पडाया शिकवेल कोण कधी आम्हा
वाट न पहाता ATS अन NSG येईल कधी अन करतील काही केंव्हा //

बिशाद त्यापुढे कुणाची काय असती करण्या नजरही वाकडी
देत बसा आयुष्य भर त्यांना आता पुराव्यांचीच पोतडी //

चुकलेच तुझे देवकी नंदना अश्वासने देणे पुन:पुन: येण्याची
षंढ देश पांघरूणात चघळतो मनोराज्ये तुझ्या आगमनाची //

येतील का पुढे मालक अन राजे करणे सोडून देशाची होळी ?
अंबानी टाटा अन मुख्यमंत्री करतील स्पर्धा खाया पहीली गोळी ? //

गरज न पडेल कधीच आम्हा पगारी हुतात्मे अन नवश्या भगवंताची
जागा खडबडून जर का होई प्राण स्वत:चा अर्पिण्या हरेक भारतवासी //

सोडून द्या भेसूर भीषण नामर्द निर्बुद्ध किडामुंग्यांचे गुणगान
यापुढे गाऊ गगन भेदी स्वरात केवळ मधमाश्यांचे राष्ट्रगान //


I proudly dedicate my own creation , the one I like the most, "The Anthem of the Bees" to the Real Hero Rashida and Rukhsana of Jammu n Kashmir who showed the spirit of this Anthem and killed terrorists. May we all always respond like them .

Click Here to see VDO clipping About Great Bravery by Rashida and Rukhsana