टाटा स्काय वर देवतांचे लाईव्ह दर्शन ! फ्री ! फ्री ! फ्री !!
रात्रंदिन च्यानल्स लागल्या श्रद्धा भक्ती सांभाळू /
सराईत खिसेकापू लागले आरती ओवाळू //
सोफ्यातल्या बटाट्यास लाभ दर्शनचा फुकट /
कशाला हवी रांग अन कशाला काढावे तिकीट //
पाहून लाचारीचा सुकाळ होई आकाश टाटा अवतार /
दरिद्री भक्तांस स्वये आर्पिण्या न्यानोभक्तीचा अविष्कार //
पुजते माय TV सोडुन व्रत सास बहु /
बाप फोडी टाहो बातम्या द्या हो पाहू //
पुंडलीक बालक नेहमी डिस्कव्हरीत दंग /
रीमोट पेक्षा वीट मऊ विव्ह्ळे पांडुरंग //
ईहलोक सोडुन चला विनवी रखुमाईचा हुंदका /
तुका म्हणे वाटे आता तुम्हा पेक्षा मंबाजी बरवा //
------- स्वरचीत.. संदीप गोडबोले .. ता. २६ जानेवारी २००८, रा, ११.००
>अधीक माहीती साठी
http://www.tatasky.com/offer_witer_promo.htm वाचा.
Saturday, January 26, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment