Friday, April 27, 2007

डायमंड रिंग

"मंथन" मधे सत्य घटनां वर आधारीत कविता असणार आहेत.
बायको दरवर्षी प्रमाणे लेकरां ना घेऊन माहेरी गेली आहे.
आणि आमच्या दुसय्रा मजल्याच्या ग्यालरीत मांडलेल्या फुलबागेची तिला नेहमी सारखी अत्यंत काळ्जी वाटते.
तिने आज मला झाडांना पाणी घातलेस काय ? असा प्रश्न केला. त्याला हे पाणीदार उत्तर :

तुझ्या फुलबागेला रोज घालतो मी पाणी /
तुझ्या़च साठी बहरतो मोगरा रोज दारी //

दारी तुझे ऊन अन दूर माझ्या सावल्या /
दूर तुझा चंद्र अन दूर माझ्या चांदण्या //

माहेरपणची तुझ्या खग्रास घनघोर छाया /
असे ही प्रणाली जणू डायमंड रिंग ची माया //

स्वरचीत > एप्रील २६, २००७

2 comments: