Tuesday, August 9, 2011

गीता : थिअरी आणि प्र्याक्टीकल

थिअरी आणि प्र्याक्टीकल ह्या परस्परावलंबी वस्तू आहेत.

आधी थिअरी की आधी प्र्याक्टीकल असा प्रश्न येतो.

प्र्याक्टीकल चे रहस्य उलगडलेकी जे लोणी मिळते ते थिअरी.

थिअरीच व्यक्त झालेली नसताना, परीस्थीतीशी दोन हात करण्याची वेळ येते तेंव्हा हरण्याची भिती न बाळ्गता समर्थ पणे सामना करण्याची हिंमत (गटस) जे दखवतात ते खरे हिरो असतात.

कोणत्याही थि. व प्र्या. दोघांचीही कमर्शीयल व्ह्याल्ल्यू काळा प्रंमाणे बदल असते.

"गीता" थियरी अर्जुनाचा निकम्मेपणा दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने निर्मिली.

या थिअरीचे मार्कॆट जबरजस्त आहे.
दैनंदीन जिवनात येणारी हताशा दूर करण्यासाठी समाजानी हजारो वर्षे गितेचा आधार घेतला आहे.

पवित्र, सात्वीक व शुद्ध सामजीक परीवर्तन करणाऱ्या संत द्न्यानेश्वर, लोकमान्य टिळक, विनेबा भावे ह्यांनी निस्वार्थ पणे गीतेचे कालानूरूप निरूपण सामन्यांच्या भाषेत केले.

मला आश्चर्य वाट्ते की या पैकी एकही जण स्वत: सशस्र प्र्याक्टिकल करण्यास धजावला नाही. ज्ञानेश्वरांनी पैठणच्या उद्दाम ब्राम्हणांची मुंड्की छाटून टाकली असती,( हा माझा भाऊ, सोयरा.. जातवाला ..असा अर्जुनी विचार न करता ) लोकमान्यांनी व्हाईसरायला बौम्ब ने उडवले असते, विनोबांनी श्रीमंतांच्या तिजोऱ्या फोडून प्रामाणीक लोकांना परत बोलीच्या अटि वर बिनव्याज पैसे दिले असते , तर देश आहे त्या पेक्षा सुधरला नसता काय ?
शिवाजी महराज, झाशीची राणि, वासुदेव बळवंत, कान्हेरे बंधू, भगतसींह, नेताजी सुभाषचंद्र, इव्हन इंदीरा गांधी यानी गितेचे प्र्याक्टिकल केले म्हणून गितेच्या थियरीस्ट लोकांपेक्षा मला यांचा आदर जास्त वाटतो.

अहींसेच्या चोचल्यांचा पुरस्कार करणारे लोक जेंव्हा गितेचे दाखले देतात तेंव्हा त्यांच्या चलाखीची दाद द्यावी आणि लोकांना मुर्ख व देशाला षंढ बनवण्याच्या हातोटि बद्द्ल त्यांना थिअरौटीकल देशद्रोही म्हणायला हवे.




To write comments : Kindly Click "टिप्पणी" . To send the Article to other friends : Click Icon of Envelop with arrow on RHS of "टिप्पणी"

No comments: