युध्द होणार !
महायुद्धच !
अटळ आहे !!
कौरव आणि पांडव दोघेही मला आपल्या बाजुने ये असे म्हणणार !
कौरवांचा महा घातकी, सत्तांध आणि हाती प्रचंड साम्राज्य असलेला पक्ष.
पांडव .. महा पराक्रमी, प्रतापी,शूर,वीर, निती संपन्न
पण
अव्यवहारी.. अवसान घातकी..
स्वता: वर संकटे ओढवून घेणारे ,
शत्रूला मित्र समजणारे..
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी पाषाण बनू शकणारे निकम्मे ..
हलकट इतके की धावाही द्रौपदीलाच करावा लागला..
अरे हरामखोरांन्नो, बरे झाले कुंतीला पणाला लावले नाही ते.
द्रौपदीने धावा केला नसता, तर कुंतीचाही पदर ढळला असता.
काय फायदा तुमच्या ताकदीचा ?
तुमच्या बाजूने लढणे म्हणजे आत्महत्त्या करण्या सारखेच आहे.
ह्या बावळट पांडवाशी पाला पडणे आणि कौरवांशी पंगा घेणे या पेक्शा दुसरी भयानक द्विधा स्थिती असू शकत नाही.
करू तर काय करू ?
पांडव लहान सैन्य बळा पेक्शा, अल्पसंतुष्ट मानसीकते मुळे युद्धास पात्रच नाहीत.
पांडवांकडे जाणे म्हणजे व्यवहारीक अर्थाने निश्चित एक्स्ट्रीम जोखीम..
आपलेच सैन्य कौरवां कडून निर्दयी पणे मारले जाईल.
आपण वाचलोच, तर जिंकलेले कौरव नंतर आपल्याला व यादवांना सोडणार नाहीत.
कौरवां कडुन जाणे ? ..
हे तर सर्वात महा भयानक !
कौरवां कडून जाणे..
म्हणजे द्रौपदीशी विश्वासघात ..
शिवाय आपली अधर्माची बाजू घेण्याची पौलीसी व इच्छा नाही.
तसेही स्टैटिस्टीक सांगते की जगात रोज, डेली बेसिस वर
अधर्माचाच विजय होतो
जो कधीच साजरा केला जात नाही.
रोज जिंके त्याला कोण हसे ?
रोज रोज झाला असता,
तर, धर्माचा विजय कोण साजरे करील ?
पांडवांची बाजू धर्माची आहे.
ते जिंकले तर पाहीजेत.
जिंकण्या साठी ध्येय लागते.
यांना इन मिन ५ गावे पाहीजेत !
एकंदरीत पांडव विजयाची प्रोबेब्लीटी फारच कमी आहे.
या युद्धात हुतात्मा बनणे शहाणपणाचे नाही.
लायकी नसताना फुकट प्रसिद्धी मिळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे हुतात्मा बनणे असे समजदार लोकांचे म्हणणे आहे.
कर्म दरिद्री पांडवां करीता हुतात्मा बनणे अभीमानास्पद नाहीच.
म्हणजे, आपण त्यांचे शत्रू आहोत असे कौरवांना चुकुनही वाटता कामा नये.
जे काही वार होतील ते पांडवांवर झालेले बरे.
शेवटी युध्द त्यांचेच आहे.
आपण पांडवांच्या टीम मधे १२ वा खेळाडू असलो तरी पांडव मोअर द्यान खूष हॊतील.
कौरवांची बौडीलाईन गोलंदाजी आपल्याला फ़ेस देखील करावी लागणार नाही ..
तरीही पांडव जिंकलेच, तर आपल्याला यथोचीत व भरपूर श्रेय देतील.
कौरवां कडून लढलो,पांडवां पासून बचावत बचावत जिवंत राहीलो, कौरव जिंकले तरी कौरव छटाक भरा पेक्षा जास्ती श्रेय देणार नाहीत.
सुईच्या अग्रा एव्ह्ढी ही दानत नसलेले मला काय देतील भडवे ?
या युध्दाचा प्रवास आणि प्लानींग आपण आपल्या नितीने व रितीने केलेले बरे.
आपले स्वत:चे सैन्य पांडवां विरूद्ध असेल तर जास्त सुरक्षीत राहील. पांडव त्यांना जास्त इजा वा नुकसान पोहचवणार नाहीत.
मी कौरवां कडॆ गेलो तर कदाचीत पांडव कौरवां एवेजी माझ्यावर जास्त राग काढतील.
भीम जवळ आल्यास त्याच्या पासून १०० % धोका.
अर्जुन जवळ अथव दूर कुठेही असला तरी २०० % डेंजर आहे.
त्याला पोपटाच्या डोळ्या सारखा माझा गळ्या शिवाय सारखे दुसरे काहीच दिसणार नाही.
कुठलाच एक अथवा सर्व १०० कौरव मिळून देखील आपल्या करीता इतके खतरनाक नाही.
कौरवांच्या हलकट,पातळयंत्री व नालायकीला आपण पुरून उरू शकतो कारण आपण स्वत: पांडव नाही.
तसेच जाग्रुत झालेच, तर पांडवांच्या पराक्रमात आपला शहीद होऊ शकतो !
कौरवांचा शहीद !
युगा युगांचा नालायक अशी माझी ओळख तयार होईल !
उघड पणे आपण कुणाच्याच विरूद्ध नसावे हेच फार बरे.
(अरे ही तर कौंग्रेस नीती !)
हं.. आता ठरले..
आपले सैन्य कौरवां कडे ..आपण पाडवांकडे ..
आपण आणि आपले सैन्य दोघे ही जास्तीत जास्त सेफ् !
पांडवांकडे काम काय करायचे ?
बाकी सगळे पांडव एक एकटे लढतात.
ज्याची त्याची स्टाईल..
अर्जून रथाचा वापर करील ..
म्हणजे आपण १२ वा खेळाडू कोड्रींक चा रथ चालवतो तसे..
आपल्याला हेच बरे आहे..!!
अर्जून !!! गुड कंपनी.. माय बेस्ट एन्ड मोस्ट ट्र्स्टॆड फ्रेन्ड !
रादर दी बेस्ट कंपनी.. नो रिस्क ! ओन्ली फन !
होय .. असे असेल
तरच कदाचीत
पांडव जिंकू शकतील..
मी शहीद न होता !
- संदीप गोडबोले
To write comments : Kindly Click "टिप्पणी" .
To send the Artical to other friends : Click Icon of Envelop with arrow on RHS of "टिप्पणी"
Sunday, March 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
कौरव पांडव ह्या विषयावरची श्री अटल बिहारींची एक कविता फार योग्य आणि वाचनीय आहे... मी कधितरी चोखून पाहिल्या तिच्या २-४ ओळी.. बाकी अभी बाकी है।
मी वाजपेयींची चव अद्याप घेतलेली नाही.
वाजपेयींच्या कवितेची आठवण येण्यास हे मनोगत कारणीभूत ठरले हे वाजपेयींचे प्राथमीक आणि मनोगताचे दुय्यम भाग्य.
मनोगताला थेट प्रतीक्रीया मिळण्याचे प्राथमीक भाग्य अद्याप नाही.
आपण दिलेल्या प्रतीक्रिये बद्दल आभार !!धन्यवाद !
_/|\_ व्यासांनी सोडलेले काहीतरी दिसले!
_/|\_ व्यासांनी सोडलेले काहीतरी दिसले.
Post a Comment