Saturday, January 26, 2008

र खु मा ई चा हुं द का

टाटा स्काय वर देवतांचे लाईव्ह दर्शन ! फ्री ! फ्री ! फ्री !!

रात्रंदिन च्यानल्स लागल्या श्रद्धा भक्ती सांभाळू /
सराईत खिसेकापू लागले आरती ओवाळू //

सोफ्यातल्या बटाट्यास लाभ दर्शनचा फुकट /
कशाला हवी रांग अन कशाला काढावे तिकीट //

पाहून लाचारीचा सुकाळ होई आकाश टाटा अवतार /
दरिद्री भक्तांस स्वये आर्पिण्या न्यानोभक्तीचा अविष्कार //

पुजते माय TV सोडुन व्रत सास बहु /
बाप फोडी टाहो बातम्या द्या हो पाहू //

पुंडलीक बालक नेहमी डिस्कव्हरीत दंग /
रीमोट पेक्षा वीट मऊ विव्ह्ळे पांडुरंग //

ईहलोक सोडुन चला विनवी रखुमाईचा हुंदका /
तुका म्हणे वाटे आता तुम्हा पेक्षा मंबाजी बरवा //

------- स्वरचीत.. संदीप गोडबोले .. ता. २६ जानेवारी २००८, रा, ११.००
>
अधीक माहीती साठी
http://www.tatasky.com/offer_witer_promo.htm वाचा.

Wednesday, January 2, 2008

छ त्र प ती शि वा जी म हा रा ज की ज य !

जाणता राजा !
अष्टावधानी !
महाराजांचे व्यक्तीमत्व असाधारण होते.

४०० वर्षां नंतर आजदेखील ते स्फुर्तीदायक आहेत. मला तर ते श्रीक्रूष्णाचा अवतार आसावेत असे वाटू लगले आहे.

रोहीडेश्वराची शपथ.
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न !
स्वप्ना साठी वेळ आल्यास प्राण देण्याची तयारी.
पण आपण संपणे म्हण्जेच स्वप्न संपणे याची सतत जाणीव. त्या करीता अत्यंत हुषारीने, अचुक planning करून बेत तडीस नेणे !
तोरणा.
अफजलखानचा वध.
प्रसंगानुरूप केलेले तह,
आग्र्याहून सुटका.
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान.
अष्टप्रधान मंडळ .
राज्याभिषेक.
सगळे केवळ अलौकीक आहे!
राज्य कर्त्याने कसे असायला हवे त्याचे सर्वोत्क्रुश्ट उदाहरण !
SWOT technic मधे महाराजं इतका perfect राज्यकर्ता जगाच्या पाठीवर पुन्हा होणे नाही.
अफ्जलखानाशी भेट, आग्र्याहुन सुटका या दोन प्रसंगाचे SWOT करून पहा !
महाराजांच्या आजुबाजुला अत्यंत विश्वासू मंडळींचे कडे सतत असे आणि ते सर्व लढ्वय्ये होते!

ईंदीरा ,राजीव, बेन्झीर यांचा कम्कुवत पणा > ही मंड्ळी SWOT मधे सपेशल नापास झाली.
शत्रूला जो ऒळखू शकत नाही, संकटाची चाहूल देखील लागण्याची संवेदना नाही ते काय राज्य करणार व काय स्वप्ने पहाणार ?
सुरक्शा व्यवस्था कुचकामी ! सर्व जण नि:शस्त्र होते ! पराकोटीचे गाफील ! यांचे सल्लगार सुद्धा त्याच लायकीचे !
सद्दाम दोन पावले मागे जाण्यात नापास झाला. अमेरीकेशी तह केला असता , तर तो संपला नसता.
शिवाबाचे आठवावे चरीत्र आठवावा प्रताप. !!

महाराज आपण परमेश्वराचे अवतार !

पुन्हा या लौकर आणि या रयतेला अध:पतनातून सोडवा !