Monday, December 31, 2012

कळेना केंव्हा


कळेना केंव्हा कधी ती आग विझुन गेली
मस्तकातील थंडी तळपायात पोहोचली
मेंदुज्वराने मनगटे हतबल झाली

कळेना केंव्हा कसा मध्यान्ही हा अस्तास गेला
दुपारी काजव्यांचा दिपवुन लखलखाट गेला
घुबडांनी कसा देश काबीज केला।


कळेना केंव्हा कसे वाघनखास नेलपौलीश लागले
अफजलखांनास असे ह्रदयाशी कवटाळले
पाठीत तानजीच्या सुरे खुपसलेले

कळेना किती अजुन ग्लानी राहीलीच येणे बाकी
पांडवांची इथे तिथे मुंडकी विखुरलेली
तरीही धरू आस स्रुजनाची तुझ्या अर्जुनाच्या सख्यारे


स्वरचीत > संदीप गोडबोले.
24 th Nov 2007


To write comments : Kindly Click "टिप्पणी" . To send the Article to other friends : Click Icon of Envelop with arrow on RHS of "टिप्पणी"

Sunday, December 23, 2012

मधमाश्यांचे राष्ट्रगान

This poem was written on 2nd of Jan 2009. I am uploading it and keeping it on the Top of the Blog . All new posts shall be posted below this .

मारता कुणी जरी काडी खडा लहानाहून लहान
तुटून पडती त्यावर मधमाश्या घोंघावत राष्ट्र्गान//

मरमर करते अथांग गर्दी लोकल मध्ये चढण्या उतरण्याची
गोळीबार होताच पळते सैरावैरा घाबरट सश्या सारखी //

नि:शस्त्र मावळे धावून गेले चिलखतही नव्ह्ते सोबतीला
हौतात्म्याचा बाजार मग मांडला मेणबत्त्या अन म्य़ाराथोनचा //

मस्तवाल राजकारणी,गाफील गुप्तचर राज्य करती गांडुळ जनते वर
अळ्या,झुरळे दिवसाउजेडी बघा जंतही झळकती च्यानेलच्यानेल वर//

हैवान १० व बौम्ब १००, हातगोळे १०००,गोळ्या १०००० फक्त जेंव्हा होत्या
पायात शेपट्या एक करॊड महानगराच्या सगळ्या टी.व्ही.समोर तेंव्हा होत्या//

धावुन नि:शस्त्र लोंढा जरी कोसळता कसाब कंपनी वरती
जीव नसते गेले इतके अन बचत देखील वेळेची होती //

तत्क्षणीच आग्यामोहोळासम तुटून पडाया शिकवेल कोण कधी आम्हा
वाट न पहाता ATS अन NSG येईल कधी अन करतील काही केंव्हा //

बिशाद त्यापुढे कुणाची काय असती करण्या नजरही वाकडी
देत बसा आयुष्य भर त्यांना आता पुराव्यांचीच पोतडी //

चुकलेच तुझे देवकी नंदना अश्वासने देणे पुन:पुन: येण्याची
षंढ देश पांघरूणात चघळतो मनोराज्ये तुझ्या आगमनाची //

येतील का पुढे मालक अन राजे करणे सोडून देशाची होळी ?
अंबानी टाटा अन मुख्यमंत्री करतील स्पर्धा खाया पहीली गोळी ? //

गरज न पडेल कधीच आम्हा पगारी हुतात्मे अन नवश्या भगवंताची
जागा खडबडून जर का होई प्राण स्वत:चा अर्पिण्या हरेक भारतवासी //

सोडून द्या भेसूर भीषण नामर्द निर्बुद्ध किडामुंग्यांचे गुणगान
यापुढे गाऊ गगन भेदी स्वरात केवळ मधमाश्यांचे राष्ट्रगान //


I proudly dedicate my own creation , the one I like the most, "The Anthem of the Bees" to the Real Hero Rashida and Rukhsana of Jammu n Kashmir who showed the spirit of this Anthem and killed terrorists. May we all always respond like them .

Click Here to see VDO clipping About Great Bravery by Rashida and Rukhsana